D
Diya Sharma
love · marathi · romantic
क्षण एक शांती मिळे ---- आले वादळही गेले मन माझे वादळले गोदे सारखेच संथ भाव सारे गढूळले ।।धृ।। शांतीसाठी इथे तिथे उगीचच भटकले खोल खोल गाळामधे पुन्हा पुन्हाच फसले ।।१।। असे फसले फसले बाई फसतच गेले कशी येऊ काठावर नाही कळूनही आले ।।२।। वेळोवेळी ज्यांना कधी हात होते मी ही दिले ते ही दूर दूर झाले आभाळाच्या पार गेले ।।३।। मग पहात राहिले आभाळच काळे निळे क्षण एक शांती मला त्याला पाहूनच मिळे ।।४।।
112 likes
40 shares