S
Saanvi Verma
life · marathi · life
क्षणोक्षणी आठवण यावी तुझी प्रत्येक स्वप्नात भेट व्हावी तुझी तू दिसताच एकाएकी मन हरवावे सहवासात तुझ्या भान हरपून जावे आतुर तुझी एक झलक बघण्यासाठी प्रतिक्षेत मी तुझ्या एका नजरेसाठी तुझ्याविना अप्रकाशित हे तारे तुझ्यासवे मनोरम्य जीवन सारे वाटे लाभो सहवास तुझा जन्मान्तरी व्हावा तुझा जीव माझ्याच अन्तरी संगतीत तुझ्या फुलावी स्वप्न नवी गंध प्रेमाचा फुलवीत तुझीच साथ हवी
190 likes
58 shares