कोहलीच्या दहा सेंच्युरी होतात तेव्हा कुठं रोहितच्या पाच सेंच्युरी पूर्ण होतात. एवढ्याच काळात राहणेला किमान पाच वेळा टीमच्या आत-बाहेर केलेलं असतं. नेमक्या इतक्याच कालावधीत रामदेव बाबाने दहा नवीन प्रॉडक्टस लाँच केलेली दिसतात. इतक्याच दिवसात नारबाने मी मंत्री होणारच असं साताठ वेळा तरी ओरडून सांगितलेलं असतं. जुमलेश्वर बाबांनी एवढ्या कालावधीत पंधरा वीस जुमले फेकून भगत लोकांच्या बुद्धीला भुरळ घातलेली असते. शेनेच्या मंत्र्यांनी बऱ्याच वेळा सरकारातून बाहेर पडायचा इशारा दिलेला असतो. तुकाराम मुंढेंची कुठूनतरी कुठेतरी बदली झालेली असते. शितली आणि आज्याचं दहा बारा वेळा भांडण झालेलं असतंय! एवढ्या वेळेत पाठकबाईंनी गायकवाड घराला कुठल्यातरी संकटातून बाहेर काढलेलं असतंय. पेट्रोल डिझेल दहा रुप्यानी वाढून दोन रुपये कमी झालेलं असतंय. तितक्याच वेळेत मोदिशेठनं निदान चार पाच देश पालथे घालून, दोन चार राज्यातल्या निवडणुकांचे नारळ फोडून खोबरं खाल्लेलं असतंय. दमलो ब्वा😊
K
Kiara Sharma
spiritual · hindi · spiritual
231 likes
22 shares