T
Tara Joshi
love · marathi · romantic
खूप खूप काळानंतर भेटणार आहोत आम्ही दोघं तिने विचारलं भेटायला वेळ आहेका? मी म्हणालो नसायला काय झालं मी विचारलं भेटायला कारण आहे का? ती उस्फुर्तपणे म्हणाली कारण कशाला हवं? उत्तरादाखल मी हसलो जरासा तशी तीही हसली मग इतका काळ जाऊ दिला तेंव्हा का नाही आपण भेटलो? हा प्रश्न ज्या अर्थी मी टाळला त्या अर्थी तिनेही तो टाळला असेल कारण शोधण्यात विनाकारण उशीर झाला हे माझ्यासारखच तिलाही कळलं असेल💝💝💝💝💝2
105 likes
53 shares