A
Aarav Rao
Love · Marathi · Heartbreak
खूप दिवस झाले आहेत आता आपले नाते संपून अशीच खूप महिने अन वर्ष ही जातील पण या आठवणी का संपत नाहीत का या आठवणी रोज रोज येत राहतात त्या येताना ऐकट्याही येत नाहीत येताना अश्रू ही सोबत घेऊन येतात विसरली असशील तू मला अन विचार करत असशील मी ही तुला विसरलो असेल असे तुला वाटत असेल पण खरचं ग मी नाही विसरलो रोज त्याच आठवणीत जगताना रोज तेच अश्रु रडताना मी खरच नाही कंटाळलो ग हे आयुष्य जगताना मी माझे हे आयुष्य तुलाच दिले होते ग अन तू का अशी वागलीस हेच कधी कळले नाही तू परत कधीच येणार नाहीस ये आता नक्की आहे पण तू आनंदी रहावी हीच इच्छा माझी आहे तुझा एक वेडा प्रियकर ....
0 likes
0 shares