खुपच चांगला मेसेज आहे कोणी लिहिला माहिती नाही चांगला आहे यासाठी शेयर करीत आहे आई-वडील * * * * * * ० "आई- वडील" म्हणजे नक्की काय असतं? ० आयुष्य जगण्यासाठी देवाने दिलेलं, अँडव्हान्स पाठबळ असतं...!!! ० तुमच्या प्रत्येक दिवसात, त्यांनी आपलं स्वप्न पाहिलेलं असतं, तुमच्या जन्मापासून त्यांच्या मरण्यापर्यंत त्यांनी आपलं आयुष्य खर्चलेलं असतं...!!! ० "आई" तुमच्या आयुष्याच्या गाडीचं योग्य दिशा देणार "स्टीयरिंग" असतं...!!! ० तर अचानक आलेल्या संकटात सावरायला, "वडील" म्हणजे "अर्जेंट ब्रेक" चा पर्याय असतं...!!! ० "आईचं प्रेम" हे रोजच्या आयुष्यात कामाला येणारं "बँक बॅलन्स" असतं...!!! ० तर "वडील" म्हणजे गरजेच्या वेळी मिळणारा तुमचा बोनस किंवा "व्हेरिएबल पेमेंट" असतं...!!! ० "आई" म्हणजे, तुम्हाला सतत जोडणार, मोबाईलचं "नेटवर्क" असतं...!!! ० आणि कधी "नेटवर्क" थकले; तर "वडील" अर्जंट "SMS" असतं...!!! ० "आई" म्हणजे तुमच्या आयुष्यातलं "अँटीव्हायरस" असतं...!!! ० तर शोधून काढलेले व्हायरस संपवायचं "वडील" हे "क्वारनटाईन" बटण असतं...!!! ० "आई" म्हणजे तुमच्या आयुष्यातलं "शिक्षणाचं विद्यापीठ" असतं...!!! ० तर "वडील" म्हणजे चालती बोलती अनुभवाची फॅकटरी असते...!!! ० "आई" म्हणजे तुमच्या आयुष्यातली साठवलेली पुण्याई असते...!!! ० तर "वडील" म्हणजे कंबर कसून आयुष्यभर मिळवलेली कमाई असते...!!! ० "आई" म्हणजे तुमच्या आयुष्यातला मागर्दशर्क गुरू असतो...!!! ० तर दाखवलेल्या वाटेवर "वडील" हा जवळचा मित्र असतो...!!! ० "आई" म्हणजे साक्षात भगवंत, परमेश्वर असतो...!!! ० तर त्या परमेश्वरापर्यंत पोचवणारा "वडील" एक संत असतो...!!! ० "आई" म्हणजे तुमचे शरीर, मेंदू, हृदय आणि मन असतं...!!! ० तर "वडील" म्हणजे भक्कम ठेवणारा पाठीचा कणा आणि शरीरातलं हाड अन् हाड असतं...!!! ० कधी वेदना झाल्यास तोंडी वाक्य "आई गंSSS" असतं...!!! ०आणि भले मोठे संकट आले की उच्चारात "बाप रे बाप" असतं...!!! ० परमेश्वर समोर आला तरी उभे राहायला वीट फेकलेल पुंडलिकाचं मन असतं...!!! ० त्याच्या आई-बापाच्या रुपात, विठ्ठलाने स्वत:लाच तिथे पाहिलेलं असतं...!!! म्हणूनच म्हणतो... ० परमेश्वर, अध्यात्म, भगवंत हे सगळे अजब गणित असतं...!!! त्या सगळ्यापर्यंत पोचवणारं ०"आई- वडील" हे कनेक्शन असतं...!!! ० "आई- वडील" म्हणजे नकळत मागे असलेली मायेची सावली असतं...!!! उगाच नाही आपल्या संस्कृतीत ०"मातृ देवो भव" अन् "पितृ देवो भव" म्हणलेलं असतं...
A
Asha Verma
Friendship · Mixed · Friendship
185 likes
83 shares