Back to feed
I
Ishaan Das friendship · marathi · friendship

गंपू घरी उशीरा आला. उशीर का झाला असं बायकोने विचारल्यावर गंपूने सांगितलं “अगं, मित्राकडे गेलो होतो गं!” बायकोने त्याचं म्हणणं तपासण्यासाठी गंपूच्या दहा मित्रांना फोन लावला. त्यापैकी पाचजणांनी उत्तर दिलं, “हो वहिनी, आलेला ना इथे तो” तिघांनी सांगितलं, “आला होता, आत्ताच गेला” तर उरलेले दोघे म्हणाले, “अहो वहिनी, हा काय इथेच बसला आहे! देऊ का त्याच्याकडे फोन?”

246 likes 56 shares
WhatsApp