A
Ayaan Chauhan
friendship · marathi · friendship
गंपू घरी उशीरा आला. उशीर का झाला असं बायकोने विचारल्यावर गंपूने सांगितलं " अगं , मित्राकडे गेलो होतो गं! ". बायकोने त्याचं म्हणणं तपासण्यासाठी गंपूच्या दहा मित्रांना फोन लावला. त्यापैकी पाचजणांनी उत्तर दिलं , " हो वहिनी , आलेला ना इथे तो " तिघांनी सांगितलं , " आला होता...हा काय , आत्ताच गेला. " तर उरलेले दोघे म्हणाले , " अहो वहिनी , हा काय इथेच बसला आहे! देऊ का त्याच्याकडे फोन ?"
74 likes
73 shares