S
Sai Rao
humor · hindi · humor
गंपू, झंपू आणि पंपूची परीक्षा असते. पण त्यांचा काहीच अभ्यास झालेला नसतो. आणखी वेळ मागून घेण्यासाठी तिघे एक शक्कल लढवतात. परीक्षेदिवशी सकाळी थकल्याभागल्या चेहऱ्याने प्रिन्सिपलना भेटून अधिक वेळ मागून घेतात.- आम्ही काल गावाहून परतत होतो. पण येताना गाडीचा टायर फुटला... जवळ कुठे गॅरेज मिळेना.. त्यामुळे उशीर झाला. प्रिन्सिपल दोन दिवसांची मुदत देतात. तिसऱ्या दिवशी तिघांना तीन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये परीक्षेला बसवतात. प्रश्न असतात- परीक्षाथीर्चे नाव- १० गुण, आणि गाडीचा कोणता टायर फुटला (१) पुढचा डावा (२) पुढचा उजवा (३) मागचा डावा (४) मागचा उजवा - ९० गुण.
124 likes
10 shares