गुरुजींनी वर्गामध्ये एक गंभीर विषय छेडला. गुरूजी: (अतिउत्साहात) मुलांनो, सध्या T20 प्रकार खुपच फार्मात आहे. तुमच्या परीक्षा सुद्धा जर T20 सारख्या असल्या तर त्यांचे स्वरूप कसे असेल? कोणाला काही कल्पना? पूर्ण वर्ग अचानक शांत झाला. कोणाला काहीच सुचेना. ब-याच वेळानंतर बंड्या ने हातवर केला गुरूजी (नकारात्मक स्वरूपात) : हा लवकर सांग काय सांगायचे ते. बंड्या गंभीर मुद्रा करून सांगु लागला. "गुरूजी परीक्षा १ तास २० मिनटाची असली पाहीजे." गुरूजी: "ठीक आहे, पुढे?" बंड्या: "दर २० मिनटानंतर विद्यार्थ्यांना आपापसात बोलण्याकरता २ मिनटाचा time off असला पाहीजे." गुरूजी टेंशन मध्ये: "बरं पुढे?" बंड्या: "पहिले ३० मिनिटे Power-play असला पाहिजे, ज्यात शिक्षक वर्गाबाहेर असतील." गुरूजींना हल्का हल्का घाम फूटू लागला. बंड्या: "प्रश्नपत्रिकेतील एक प्रश फ्री हिट असला पाहिजे. विद्यार्थ्यांनी जे काही उत्तर लिहिले असेल त्याला पूर्ण मार्क मिळाले पाहिजेत." गुरूजींचे कपडे घामाने ओले झाले. बंड्या: "आणि दर २० मिनिटांनी चिअर लिडर्स नीं वर्गात येऊन २ मिनिट डांस केला पाहिजे." पूर्ण वर्गात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि विद्यार्थी बंड्या ला खांद्यावर घेऊन नाचू लागले.☝🏻☝🏻👏🏻👏🏻 गुरूजी कायमचे पावर प्ले मध्ये (वर्गाबाहेर) गेले. 😷😂😂
K
Krishna Malhotra
friendship · mixed · friendship
186 likes
57 shares