Back to feed
K
Kunal Pawar Family · Marathi · Family

गर्दीतल्या माणसा रे एकदाच वर्दी घालुन पहा . हुकुमांची ती बांधुन शिदोरी रात्र आर्धी चालुन पहा. रस्त्यावरती उभ राहुन आस घराची लावून पहा. आस लावण्याआधी मात्र त्या अर्धांगिणीला जेवुन घ्यायला सांगुन पहा. उशीर होईल यायला म्हणुन सानुल्याला,फोनवरच चाॅकलेट देउन पहा. अन थकलेल्या डोळ्यांनी वाट पहाणार्या आई-बाबाला सहा महीन्यानी येउन भेटुन पहा. हे सर्व काही करताना एकदा शत्रूची छातीवर गोळी झेलून पहा. श्वास अखेरचा घेताना फक्त तिरंग्यालाच सलाम करून पहा . गर्दीतल्याच माणसा रे एकदाच वर्दी घालुन पहा. हा जन्म फक्त आपल्या समाजसेवेसाठी महाराष्ट्र पोलीस - वर्दीतला माणूस

169 likes 14 shares
WhatsApp