Back to feed
A
Avni Joshi family · marathi · family

"गौरी".........निषेध.... माणसाच्या भ्याडपणावर काय बरे बोलू मी.... शब्दांचा मांडून तांडव,षंढांना "पुरूष" कसे बोलू मी... मांडलास संसार, निसर्गाच्या उपकाराने पैदा करतोस जीव मग सांग तुला "बाप " कशी बोलू मी.... जेंव्हा जेंव्हा ओलांडला समाजाचा दंभउंबरठा आम्ही संपवल्याच गेलो ..मग "गौरी" हरली कसे बोलू मी.... संपव तुला जमेल तेवढे माझ्या सद् बंडखोरीला पुन्हा पुन्हा जन्मेल मीही मग "संपली" कसे बोलू मी... अशा माणसाच्या भ्याडपणावर काय बरे बोलू मी..... काय बरे बोलू मी!!!!

40 likes 32 shares
WhatsApp