गुरुविण कोण दाखवी वाट ! आयुष्याचा पथ ही दुर्गम , अवघड डोंगर घाट !! आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनीमाझे आयुष्य घडविले त्या गुरुजनांना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना "व्यासांचा मागोवा घेतू" असे म्हणून सुरुवात केली. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. "गुरु बिन ज्ञान कहासे लाऊ?" हेच खरे आहे. गुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते, तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो - गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll
47 likes
58 shares