Back to feed
T
Tara Iyer Family · Marathi · Family

गाव... भल्या पहाटे कोंबडं आत्ता कुठे आरवते... शेणा-मातीनं अंगण आत्ता कोण सारवते... जात्यावर दळताना माय ओव्या गात होती... भुलाबाईच्या गाण्याची दोस्ता! न्यारी बात होती... बजारातून येताना बाबा भातकं आणत... आजी बजाराच्या जुन्या बसे आठोनी सांगत... माह्या गावात हरेक दु:ख वाटल्या जायचे... लेकीबाईले सासरी गाव सार करायचे... भिंतीवर थापलेल्या आत्ता गव-या सरल्या... तापावरल्या गोष्टीच्या फक्त आठोनी उरल्या... आत्ता येत नाही कानी हाक "बांगडी बिल्लोरं" टॅक्टरनं हाकलले गावातून गुरं-ढोरं... गावातल्या जीवनाचे आत्ता निराळे संदर्भ... माह्य गाव शहराचा जणू पोसतेय गर्भ.... शहरात येत नाही गंध गावाच्या मातीचा... माह्य गाव जाणायचे अर्थ दिव्याच्या वातीचा... नद आटल्यापासून गेला जिव्हाळा आटून... येत नाही कुणासाठी आत्ता काळीज दाटून... वाळू उपसण्यासाठी ट्रक नदीच्या पात्रात... आसू गावाच्या मातीचे फक्त आजीच्या डोयात...

5 likes 28 shares
WhatsApp