Back to feed
J
Jiya Iyer heartbreak · marathi · heartbreak

जो हाथ सोडून गेलास, तुझ्या दिशेनेच आहे... जणू अपेक्षा हाताची, तो हात पुन्हा दे... जीवाची झळ, हृदयाची कळ, कळली नाही कारे तुला ? मुके प्रश्न माझे, तुझ्या उत्तराची साद दे.... ती वाट थांबलेली, दबकी पाउले... दिशा अंधारलेली, निशब्द तुझी चाहुले... जीव शोधतोय रे, तू असल्याची हाक दे... मुके प्रश्न माझे, तुझ्या उत्तराची साद दे... तो क्षण, वेळ, अन वाट ती, पुन्हा विचारतात, का ग तू एकटी ? नको होऊस उदास, पुन्हा आयुष्याला हात दे... हात हि तुझा अन आयुष्यही,ठाऊक नव्हते कारे तुला ? मुके प्रश्न माझे, तुझ्या उत्तराची साद दे... मन जाणते मन तुझे, विरह हे तुलाही टोचते, तरी निशब्द तू का असा? एकदा तरी हाक दे... तुझ्या सुखः पायी विरह, तरी हसू हरवले कुठे? मुके प्रश्न माझे, तुझ्या उत्तराची साद दे...

168 likes 45 shares
WhatsApp