*जगण्याचं सूत्र चुकतंय का ?* * * * * * * * * * * * * * * * * माणूस काही अहंकार सोडायला तयार नाही जगण्याचं " सूत्र " चुकतंय पण खोडायला तयार नाही भाऊ काय बहीण काय नुसता फापट पसारा कोण कोणाला विचारतय कुणालाही विचारा कुणी कोणाकडे जाई नं कुणी कुणाकडे येई नं जगलात काय मेलात काय माया कुणाला येई नं संवेदनशीलता आता फारशी कुठं दिसत नाही बैठकीत किंवा वसरीवर गप्पाची मैफिल बसत नाही पॅकेज, इनक्रिमेंट, सॅलरी इन्व्हेस्टमेंट, विकएन्ड यातच हल्ली माणसाचा होत आहे the end Luxury मधे लोळतांना फाटकं गाव नको वाटतं जवळचं नातं असलं तरी सांगायलाही नको वाटतं उच्च शिक्षित असूनही माणूस आज mad वाटतं इंटेरियर केलेल्या घरामधे लुगडं, धोतर odd वाटतं सगळेच पाहुणे सगळेच मेव्हणे कसे काय posh असतील पार्लर मधून आणल्या सारखे चिकणे चोपडे कसे दिसतील उन्हा तान्हात तळणारी माणसं काळी पडणारच गरीबीन गांजल्यावर चेहऱ्याचा रंग उडणारच कुरूप ते नाहीत कुरूप तू झालास प्रेम नात्यावर करायचं सोडून दिसण्याला भुलून गेलास काळी असो गोरी असो माय ही माय असते बाप स्वतःला गाडून घेतो म्हणून तुझी मजा असते पात्र कितीही मोठं झालं तरी गंगेच मूळ विसरू नये सुख असो का दुःख असो आपल्या माणसाला विसरू नये दिसण्यावर प्रेम करू नकोस आपलं समजून जवळ घे एरव्ही नाही आलास तरी दिवाळीला तरी घरी ये कॉम्पुटरच्या भाषा खूप शिकलास माणसावर प्रेम करायचं शिक नाहीतर मानसिक आरोग्यासाठी दारोदार मागत फिरशील भीक दुसऱ्याचा छळ करून तुम्ही सुखी होणार नाही पॅकेज कितीही मोठं असू द्या जगण्यात मजा येणार नाही जग जवळ करतांना आपली माणसं तोडू नका अमृताच्या घड्याला अविचाराने लाथाडू नका..! *मी का बोलू?* *मी का फोन करू?* *मी का कमीपणा घेऊ?* *मी का नमते घेऊ?* *मी का नेहमी समजून घ्यायचं?* *मी काय कमी आहे का?"* असे बरेच सारे "मी" आहेत जे आयुष्यात विष कालवतात म्हणून , मी पणा सोडा व नाती जोडा !! ... 🙏🙏🙏🙏 🙏🙏🙏🙏
107 likes
28 shares