Back to feed
S
Shaurya Mishra humor · marathi · humor

*जगात सर्वात पवित्र खाद्य कोणते?* 😁😁😁😁 तंबाखू कोणत्याही वारी चालते एकादशीला चालते द्वादशीला चालते कोणत्याही सणाला चालते अमावसेला चालते पोर्णिमेला चालते सकाळी चालते रात्री दोन वाजताही चालते. 365 दिवस अहोरात्र चालते. कितीही पवित्र वस्तू आणी कुणाचीही चालते शिवाशिव नाही अंत्यसंस्काराच्या वेळीही चालते व जन्मावेळी चालते हिला खायला केव्हाच बंधन नाही . अगदी जगत मान्य जातपात नाही धर्म नाही चोळुन खातात मळुन देतात चुना लावून खातात भाग्यवान वनस्पती आहे हो. पैशा पेक्षा जास्त जपतात न विसरता खिशात घेतात. सगळं विसरतील हिला विसरनार नाही. समोरच्याला वेळ देणार नाही हिला कोप-यात नेवून चोळतात आहे का? अतिप्रिय खाद्य 900रूपये किलो आहे हो ही काजू पेक्षा महाग पण गरिबातला गरिब खातो. काजू कधी खिशात ठेवतो का नाही पण हि सटवी आतल्या कप्प्यात राहते अगदी ह्रदयाशी कवटाळुन असते. तंबाखू म्हणजे आवडती राणी. नाही का? 😁

106 likes 40 shares
WhatsApp