Back to feed
A
Aditya Kumar love · marathi · romantic

जाताना तरी आज एकदा माझं होऊन जा शेवटच्या भेटीमध्ये आयुष्यभराची साथ देऊन जा भावनांना आवरायचं काम माझे मी करेन एकदा तरी तुझा हात माझ्या हातात देऊन जा जाताना तरी आज एकदा माझ होऊन जा खूप काही साठवले आहे मनात माझ्या ते तरी आज ऐकूण जा डोळ्यात साठवलेले तुझ्या प्रेमाचे भाव तुझ्याच त्या डोळ्यांनी पाहून जा जाताना तरी आज एकदा माझ होऊन जा कळत नकळत जन्मलेल्या ह्या नात्याला तुझ्या विश्वासाची साथ देऊन जा पुढे कधी भेटू न भेटू या घायाळ मनावर तुझ्या प्रेमाची फुंकर घालून जा जाताना तरी आज एकदा तू माझं होऊन जा ना ग पिल्लू —

109 likes 63 shares
WhatsApp