: ज्यांनी तुमचा Struggle पाहिलाय.., फक्त त्यांनाच तुमच्या यशाची खरी किंमत कळते.....! इतरांसाठी.., "You are just a lucky person...!" 📖वाचुन पहा नक्की आवडेल 📖 *कसं जगावं..? *मनुष्य गरीब असला की लोक म्हणतात पैसे कमवायची अक्कल नव्हती. त्यामुळेच चार पैसे कमवू शकला नाही..🤕🤕* *श्रीमंत असला की म्हणतात, दोन नंबर करत असणार.. त्याशिवाय का कुणी आजकाल श्रीमंत होतं..? प्रामाणिकपणे वागून पैसे मिळत नाहीत. आम्ही चोवीस तास राब-राब राबतोय. झालो का श्रीमंत..?👳🏼👳🏼* *पैशाच्या मागे धावू लागला की म्हणतात, पैशाची हाव सुटली आहे.. 💵💴🏃🏽* *पैशाला जीवनात महत्व दिलं नाही तर म्हणतात, त्याच्या जीवनात काही महत्वाकांक्षाच नाही..! 😮😮* *नुसतेच पैसे कमावले आणि खर्च न करता साठवून ठेवले, तर कवडी चुंबक म्हणतात.* *चैन केली आणि जरा पैसा खर्च केला तर लगेच, उधळ्या म्हणतात.🤗🤗* *वाडवडीलांची संपत्ती मिळाली तर त्याचेही सुख लोकांना पाहवत नाही. लगेच त्याला म्हणणार, बघा कसा बसलाय आयत्या बिळावर नागोबा..! स्वत:चं काही कर्तृत्व दाखवलं कधी आयुष्यात..?😴😴* *आयुष्यात कष्ट करून पैसे कमावले तरी टोमणे काही सुटत नाहीत. म्हणतात, काय उपयोग आहे त्याच्या आयुष्याचा..? नुसता पैशाच्या मागे धावतोय पण सुख उपभोगायला वेळ नाही. असं आयुष्य काय कामाचं..?🚶🏼🚶🏽* *जास्त भाविक असला तर म्हणतात, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव..🙂🙂* *आणि मंदीरात नाही गेला तर नास्तिक म्हणतात.👺👺* *तारुण्यात अकाली मृत्यू आला तर हळहळतात, अरेरे फार लवकर गेला. त्याचा भविष्यकाल उज्ज्वल होता. 🗣🗣* *दीर्घायुषी झालात तर तेच लोक म्हणतील, अजून किती दिवस सरकारची पेन्शन खाणार कुणास ठाऊक..?💂🏼💂🏼* *मनुष्य तब्येतीने बारीक असला तर झुरळ🕷 म्हणतात. जाड असला की हत्ती 🐘 म्हणतात. बारीक माणूस दिसल्यावर म्हणतात तुझ्याकडे पाहिलं की देशात दुष्काळ पडलाय असं वाटतं.🙁🙁 जाड मनुष्य बघितल्यावर म्हणतात हा दुष्काळ असल्या माणसांमुळेच पडतो..!👹👹* *सहज कोणाला मदत केली तर म्हणतात, यामागे नक्कीच काहीतरी हेतू असणार.* *नाही मदत केली तर म्हणणार, साधी माणूसकी नाही बघा..😱😱* *सरळ स्वभावाचा असेल तर म्हणतात, अंगात थोडातरी स्वार्थ हवा.👨🏻👨🏻* *स्वार्थी असलाच तर म्हणतात, माणसाचा स्वभाव सरळ हवा. स्वार्थाची संपत्ती काय कामाची..?🤓🤓* *खेळकर स्वभाव असला तर म्हणतात, आचरट आहे. परिस्थितीचं गांभीर्य नाही. 😏😏* *आणि गंभीर असणंही त्यांना रुचत नाही. म्हणतात, हसण्याची अलर्जी आहे याला. कोण जवळ येईल याच्या..!😂😂* *तुम्ही यशस्वी झालात तरी यांना अडचण होते. म्हणतात, आमचं ऐकल्यामुळेच यशस्वी झाला.💁🏼💁🏼* *अयशस्वी झालात तर म्हणणार, आमचं ऐकलं नाही. मग भोगा कर्माची फळं..!🙇🏻🙇🏼* *लोकांचं काय घेऊन बसलात..? काहीही केलंत तरी त्याला नावं ठेवण्याची त्यांना सवय असल्याने त्यांचं म्हणणं किती मनावर घ्यायचं..?* *जग काय म्हणेल याची पर्वा करत आपलं जीवन का नासून घ्यायचं..?🤔🤔* *मंगेश पाडगावकरांनी फार सुरेख शब्दात ही भावना व्यक्त केलीय..* *फिदीफिदी हसतील ते हसू देत की.. बोटं मोडीत बसतील ते बसू देत की..!* *आपण का शरमून जायचं..?* *कशासाठी वरमून जायचं?* *कशासाठी भयाने ग्रासून जायचं..?* *फुलायच्या प्रत्येक क्षणी कशाला* *नासून जायचं..?* *आपलं जीवन आपण ठरवायचं, कसं जगायचं..* *कण्हत-कण्हत कि गाणं म्हणत, हे आपणच ठरवायचं..!*. *खुप छान आहे* *नक्की शेअर करा* *🔰🍀••••••*🔰🌱🍀
26 likes
37 shares