Back to feed
A
Atharv Rao Life · Mixed · Life

*जरी भांडलो, रागाराग केला,* *एकमेकांवर तुटून पडलो,* *एकमेकांवर दादागिरी करण्यासाठी,* *शेवटी तर आपणच दोघं असु.* *जे बोलायचं ते बोल,* *जे करायचं ते कर,* *एकमेकांचे चष्मे शोधण्यासाठी,* *शेवटी तर आपणच दोघं असु.* *मी रूसलो तर तु मला मनव,* *तु रुसलीस तर मी तुला मनवीन,* *एकमेकांचे लाड करण्यासाठी,* *शेवटी तर आपणच दोघं असु.* *जेव्हा नजर कमी होईल,* *स्मरणशक्ती पण कमी होईल,* *तेव्हा एकमेकांना,* *एकमेकांमध्ये शोधण्यासाठी,* *शेवटी तर आपणच दोघं असु.* *गुडघेदुखी जेव्हा वाढेल,* *कुठे बाहेर फिरणं ही थांबेल,* *तेव्हा एकमेकांच्या,* *पायाची नख कापण्यासाठी,* *शेवटी तर आपणच दोघं असु.* *"माझे रिपोर्ट्स अगदी नाॅर्मल आहेत,* *I am Alright",* *असं बोलुन एकमेकांना छेडण्यासाठी,* *शेवटी तर आपणच दोघं असु.* *जेव्हा आपली साथ सुटेल,* *अंतिम निरोपाची वेळ येईल,* *तेव्हा एकमेकांना माफ करण्यासाठी,* *शेवटी तर आपणच दोघं असु,* *शेवटी तर फक्त आपणच दोघं असु, 🎎* ☺

54 likes 4 shares
WhatsApp