*✍🏻🖥🎞📽॥ जीवनामृत ॥🎥🎞🖥✍🏻* *कृतज्ञता* ▫मी आज तुम्हांला चित्रपटातील हिरो व जगावर अधिराज्य करणारा सुपरस्टार, खर्या जीवनातही कसा सुपरहिरो आहे ते सांगणार आहे . . . ▫अंदाजे जानेवारी-फेब्रुवारी 1984 सालची ही गोष्ट . . . ▫त्या काळातील नावाजलेले सुपरहिट डायरेक्टर-प्रोड्युसर प्रकाश मेहरा हे सन 1982 ते 1984 च्या दरम्यान प्रचंड आर्थिक नुकसानीत होते . . . ▫गाडी, बंगला व इतर संपत्ती सर्व गहाण पडले होते . . . ▪राजाचा रंक कसा व कधी होईल हे अनेकांना न समजणारी गोष्ट आहे . . . ▫या वाक्याप्रमाणेच प्रकाश मेहरा यांचे झाले होते . . . ▫प्रचंड कर्जाच्या ओझ्याने सर्व बाजूने दबाव व मार्केटमधील कमी होत चाललेली पत पाहता प्रकाशजींना जगणे मुश्कील झाले होते . . . ▫परंतु प्रकाश मेहरा हार मानणार्यांपैकी नव्हते . . . ▫एक दिवस त्यांना एक पटकथा समोर आली, त्यांना ती खूप आवडलीही, पण या पटकथेला शोभणारा व योग्य न्याय देणारा हिरो असावा तर फक्त अभिताभ बच्चनच . . . ▫असे त्यांना मनोमन वाटले, पण अमिताभ बच्चन तर सुपरस्टार आहे, त्यांच्याकडे अनेक मोठ्या बॅनरचे चित्रपट आहेत आणि आपल्याला त्यांचे मानधन द्यायला जमेल का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले . . . ▫या आधी अमिताभ बच्चन यांना बरोबर घेऊन अनेक चित्रपट केलेले होते. प्रकाश मेहरांनी निर्देशित केलेल्या अनेक चित्रपटांमुळेच अमिताभ हे सुपरस्टार झाले होते. प्रकाश मेहरांनी "जंजिर" या चित्रपटात प्रथम भूमिका दिली होती व तिथून पुढेच अमिताभजींचे सर्व चित्रपट सुपरहिट होत गेले. पण या बाबत त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारचा अहंभाव व अहंकार उफाळून आला नाही. उलट अमिताभ हा सुपरस्टार आहे म्हटल्यावर आपला चित्रपट साईन करेल का ? या विचारांनी मनात काहूर उठले होते . . . ▫काय करावे ? काय करु नये ? या विचारात आठ दिवस प्रकाश मेहरांचे मन सुन्न झाले होते, पण नंतर विचार केला की आपण एक फोन करुन तर पाहू . . .? ▫मनाची तयारी करुन प्रकाशजींनी अमिताभ बच्चन यांना फोन लावला . . . फोन PA नी ऊचलला, आणि त्याने बच्चन साहेबांना फिल्म निर्देशक प्रकाश मेहरांचा फोन आहे असे सांगितले . . . ▫बच्चन साहेबांनी फोन घेतला व बोलायला सुरुवात केली . . . ▫समोरुन प्रकाश मेहरा : "अमिताभजी, माझ्याकडे नवीन व अर्थपूर्ण स्क्रिप्ट तयार आहे आणि मला वाटते की, यातील मुख्य भुमिकेला फक्त तुम्हीच न्याय देवू शकता . . . !" ▫अमिताभ बच्चन यांनी काहीही उत्तर न देता फोनचा रिसीव्हर ठेवून दिला . . . ▫प्रकाशजी खूप नाराज झाले, त्यांना वाटले की, सुपरस्टार असल्याने बच्चनसाहेब खूप बिझी असणार; अन् आपल्या चित्रपटात काम करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसणार; म्हणूनच काहीही उत्तर न देता फोन ठेवला असावा . . .? ▪या प्रकाराने प्रकाशजींचे डोकं खूप जड झालं होतं, त्यांनी पत्नीला चहा मागितला . . . ▫फोनच्या रिसीव्हरकडे एकटक नजर लावून प्रकाशजी चहा घेत होते . . . ▫अचानक दारावरच्या बेलचा आवाज खणखणला . . . ▫प्रकाशजी स्वत: उठले व जड पावलांनी दार उघडण्यासाठी गेले . . . 🤔समोर बघतात तर काय? ▫दरवाज्यात फिल्मइंडस्ट्रीमधील सुपरस्टार पत्नी जया बच्चन यांच्यासह दांपत्य साक्षात हजर होते . . . ▪प्रकाशजींना प्रचंड आनंद झाला . . . ▪तोंडातून शब्दही फुटेना . . . ▪आभाळ ठेंगणे वाटायला लागले . . . ▪साक्षात परमेश्वरच आपल्या दारात उभे असल्याचा भास झाला . . . ▫प्रकाशजी व त्यांच्या पत्नीने दोघांचे आदराने स्वागत केले . . . ▪पाहुणचाराबरोबर चर्चा चालू झाली . . . ▫प्रकाश मेहरा नवीन स्क्रिप्ट सांगू लागले . . . ▫तेवढ्यात अमिताभ बच्चन यांनी त्यांना थांबविले व म्हणाले की, "प्रकाशजी, तुम्हाला स्क्रिप्ट आवडली म्हटल्यावर मला सांगण्याचा प्रश्नच येत नाही . . .!" "आत्ता लगेच अॅग्रीमेंट करुन घ्या व आज पासून तीन महिन्यात आपला चित्रपट रिलिज झाला पाहिजे अशा तयारीला लागा . . .!" ▫असे बोलून अमिताभ बच्चन यांनी सध्या चालू असणार्या चित्रपटांच्या निर्देशकांना लगेच फोन केले व सांगितले की, "मी तीन महिने आपल्या चित्रपटांचे शुटिंगसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही. आपले उर्वरित शुटिंग तीन महिन्यांनंतरच सुरु होईल . . ." ▫प्रकाशजींनी वकील बोलावून डाॅक्युमेंटची व्यवस्था केली . . . ▪पण अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एक अट घातली . . . ▫अमिताभ बच्चन : "आपला चित्रपट न थांबता सलग काम करुन चित्रपट तीन महिन्यात पुर्ण करु...! पण त्यासाठीचे माझे मानधन मी स्वत: ठरविणार . . . तुम्ही द्याल त्यात माझे समाधान होणार नाही . . . ▫प्रकाश मेहरा हे आधीच आर्थिक अडचणीत ? त्यात ही वेगळीच अट ? काय करावे काही समजेना ? पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर खूप गाजणार व सुपरहिटही होणार याची खात्री असल्याने त्यांनी लगेच ही अटसुध्दा मान्य केली . . . ▫सर्व डाॅक्युमेंट तयार झाले अन् सहीसाठी अमिताभ बच्चन यांच्यापुढे ठेवले . . . ▫अमिताभ बच्चन यांनी अॅग्रीमेंटवर आधी सह्या केल्या व मानधनाच्या जागी स्वत: रक्कम टाकली . . . ▪मित्रांनो; ही रक्कम होती फक्त *एक रुपया* . . . 👉🏻होय, *फक्त एक रुपयाच . . . !* ▪अजब आहे ना ? 👉🏻यालाच तर *कृतज्ञता* म्हणतात . . . ▫ज्या माणसांमुळे आपण सुपरस्टार झालो, तो माणूस आज अडचणीत आहे आणि त्यांना अडचणीतून बाहेर येण्यासाठी आपली मदत होते म्हटल्यावर निस्वार्थपणे लगेचच पुढे होऊन समोरच्याला सावरण्यासाठी खूप मोठे मन व वाघाचे काळीज लागते . . . ▫प्रकाशजींनी अॅग्रीमेंट वरील रक्कम पाहिली व त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळले . . . ▫प्रकाशजींनी उभे राहून बच्चन साहेबांना मिठी मारली व एकदाचा बांध फुटला . . . ▫साक्षात माणसातला माणूसकी जपणारा भगवंत आज त्यांना सावरायला त्यांच्या घरी, त्यांच्या जवळ हजर होता . . . ▪मित्रांनो, येथे दोन्ही मातब्बर श्रेष्ठ म्हणावे लागतील . . . ▪कारण प्रकाश मेहरांनी जर पूर्वी चांगले काम केले नसते तर हा दिवस उजाडलाच नसता . . . ▫बरोबर तीन महिन्यांनी म्हणजे *18 मे 1984* रोजी संपूर्ण देशभर सर्व चित्रपटगृहांमध्ये हा अनोखा व अायुष्याला कलाटणी देणारा चित्रपट रिलीज झाला आणि सुपर-डुपर हिट ठरला . . . 👉🏻हा अनोखा चित्रपट होता *________शराबी* ▪हाच तो चित्रपट ज्याने प्रकाश मेहरांच्या आयुष्याला नव कलाटनी देवून पुन्हा सोन्याचे दिवस आणले . . . ▫मला माहिती आहे की, मी थोडक्यात वाचलेली वा ऐकलेली ही कथा माझ्या शब्दशैलीत लिहिल्यामुळे एखाद्याला आवडेल किंवा नाही पण आवडणार . . . ▫पण मला मात्र *कृतज्ञता* या शब्दाच्या अर्थासाठी अगदी समर्पक वाटली म्हणून अवर्जून लिहिण्याचे धाडस केले आहे . . . ▫आयुष्यात आपणही असेच वागलो तर आपल्याही आयुष्याचे सोनं होईल असे मला मनोमन वाटते . . . *👉🏻नाहीतरी या जन्मात दुसरे आहेच काय ?* ▫आपल्यामुळे जर एखाद्याचा संसार पुन्हा उभा राहत असेल तर यापेक्षा आपल्या आयुष्यातील पुण्याचे काम दुसरे असूच शकत नाही . . . ▫म्हणून आपल्या बरोबर असणारांचा नेहमी आदर करा... त्यांना विश्वासाने जिंका, व त्यांनी केलेल्या उपकाराची जाणीव पावलो-पावली ठेवा . . . सर्वांना खर्या अर्थाने *कृतज्ञता* या शब्दाची व्याप्ती समजावी व आत्मज्ञानाची प्रचिती . . . चुकलेल्यांना व संकट ग्रस्तांना तर चांगला व योग्य रस्ता दिसावाच परंतु चुकून आपल्यातलेच दुखावलेले, दुरावलेले आप्तजन पुन्हा एकत्र नांदावेत, आनंदात रहावेत यासाठी शुभचिंतन ... *🎉🎄🎁...good morning.🎁🎄🎉* *॥ शुभं भवतु ॥*
K
Kabir Sharma
Good_Morning · Mixed · Good_Morning
151 likes
53 shares