डॉ. विकास आमटे यांची एक सवय 👉 पारले G चा 2 रुपयांचा छोटा पुडा येतो. त्याच्या 40 पुड्याचा पैक बहुतेक 75 रूपयाला मिळतो. तो नेहमी माझ्या गाडीत ठेवतो. हैण्ड ब्रेक जवळ पाच सात पुडे आरामात राहतात. सिग्नलला लहान मुले, तान्ह्या बाळाला सोबत घेऊन फिरणारी बाई, थरथरणारे शारीर सांभाळत फिरणारे वृद्ध अश्या कोणीही हात पसरला की एक पुडा टेकवतो. आपण दिलेल्या चिल्लरचे पुढे काय होते हा वादग्रस्त प्रश्न आहे. बिस्किटच्या पुड्याबाबतीत अश्या काही शंका मनात येत नाहीत. गराजेच्या वेळी ती 5 बिस्किटे मोठा आधार देतात. सर्व जण आनंदाने खातात. दोन रूपयात काय येतं आजकाल? याचं योग्य उत्तर मिळतं आपल्याला. सिग्नलला पसरणारा हात "कशासाठी? पोटासाठी!" पसरत असेल तर पारलेG कधीही कुठेही केव्हाही अणि कोणालाही उत्तम. अजुन एक सर्वात महत्वाचे म्हणजे, यामागचा माझा मूळ उद्देश् जरी "कोणी हात पसरला तर पैश्यापेक्षा असं काही कधीही उत्तम" असा असला तरी वेळप्रसंगी मला स्वतःला एखादं पाकिट फोडून खाताना किव्वा कोणी बरोबर असेल तर त्यांना ऑफर करताना काहीही गैर वाटत नाही. "आपण हे भिकार्याना देतो, आपण कसं खायचं" हा विचारही मनाला शिवत नाही. कोणी गाडीत बसल्यावर जेव्हा इतके बिस्किटचे पुढे पाहतात तेव्हा हसून विचारतात की काय रे हे. पण जेव्हा मी कारण सांगतो तेव्हा बहुतेक जण, "अरे वा, मी पण ठेवतो आजपासून माझ्या गाडीत" असे म्हणतो तेव्हा छान वाटते. कोणीही असो, कसाही असो... भूक, भूक असते अन्न, अन्न असतं खरं पूर्णब्रम्ह असतं! •• Please sent this valuable massage to each group in which you have been the part Dr. Vikas Baba Amate
169 likes
54 shares