Back to feed
S
Saanvi Gupta family · mixed · family

डाॅक्टर. :- तुमचं वय काय? पेशंट बाई :- अं...२८ वर्षे..! 😏 डाॅक्टर. :- त्याचं काय आहे की, मला तुम्हाला बेहोश करण्यासाठी तुमच्या वया नुसार डोस द्यावा लागणार आहे म्हणून विचारतो. पेशंट बाई :- अो.. अस्स्ंय होय..मग मी ३२ वर्षांचीच आहे..! 😒 डाॅक्टर :- बघा हा..! औषधाची मात्रा वयानुसार दिली गेली नाही तर कदाचित त्याचा सरळ परिणाम तुमच्या शरिरावर होऊन "किडणी" देखील "फेल" होऊ शकते पहिलंच सांगतो.😳 पेशंट बाई. :- अरे बापरे..! ठिक आहे. ३८ वर्ष लिहा..😡 डाॅक्टर :- हे बघा..! जर मात्रा चुकीची दिली गेली तर तुम्ही कोमा मध्ये देखील जाऊ शकता..! 😳 पेशंट बाई :- अरे मेल्या!! 😡 ४९ वर्षे लिही..! 😡 आता आॅपरेशन थिएटर मधून माझा मुडदा जरी बाहेर आला तरी बेहत्तर..! ४९ म्हणजे ४९..FINALLY.. याच्यापूढे मी जाऊ शकत नाही.. 😜 😜 😜 😜 😜 😜 😜 😜 😜 😜 😜

84 likes 32 shares
WhatsApp