A
Aarav Chauhan
Love · Marathi · Heartbreak
डोळ्यात राहतो, ओठात राहतो! तुझिया हरेक मी श्वासात राहतो!! छळतात कावळे का सारखे मला? माझीच चूक मी मसणात राहतो! दुनियेस पाहिजे आरास दर्शनी जो जो नटेल तो मखरात राहतो! समशेर मी परी, कळणार हे कसे? मी नेहमी असा म्यानात राहतो! माझ्या फुलायचे अप्रूप ना कुणा मी रानफूल मी रानात राहतो! वरुनी बघून का कळते कधी कुणा? माणूस केवढ्या पाण्यात राहतो!
0 likes
0 shares