A
Aditya Deshmukh
love · marathi · romantic
तू आणि मी, अशी फक्त कल्पना नसावी सोनेरी त्या क्षणाला, एकांताची साथ असावी गुलमोहराचा बहर, आणि तिथेच आपली भेट असावीं जसे एखाद्या पाखराची,गोड ड्रिम डेट असावी ......... तू मात्र आवडत्या,आकाशी रंगाच्या पोशाखात असावस आकाशाला ही हेवा वाटावा,इतकी ती पहाट सुंदर दिसावी रंगलेल्या त्या गप्पांमध्ये, प्रेमाची पण ओढ असावी एकमेकांत गुंतून जाताना,परतीची मात्र तम नसावी निरोप घेताना डोळ्यांमध्ये,अश्रुंची एक झलक दिसावी डोळ्यांमधले भाव जाणूनि,नाजूकशी ती मिठी असावी जीव ओतला तुझिया पायी,आशा तुझीही हीच असावी एकांताची साथ अशी हि, दरवेळी रम्य असावी..... ......................................
144 likes
53 shares