Back to feed
S
Shaurya Verma love · marathi · romantic

तु जिंकावं म्हणून मला नेहमी हरावं लागत होतं कधी मी जिंकावं म्हणून तुला एकदा तरी हरताना पाहायचं होतं तुझ्या वाटेवर शिणलेल्या त्या डोळ्यांना माझ्या आठवनिंनी तुझ्या डोळ्यात पाणी पाहायचं होतं तुला नुसतं त्या हिरव्या शालूत पाहायचं नव्हतं तर तुझ्या हातावर काढलेल्या म्हेन्दीत माझं नाव शोधायचं होतं तुझ्या हातात भरलेला हिरव्या चुडया सोबत तुझ्या कपाळी माझ्या नावचं कुंकू लेहलेलं पाहायचं होतं चार चौघात तुला माझी म्हणून मिरवायचं नव्हतं तर महाबळेश्वरच्या त्या गुलबी थंडीत हि फिरवायचं होतं सगळच जर एकतर्फी असतं तर काहीच वाटलं नसतं पण तेव्हा तुला माझ्या जीवाशी खेळताना काहीच कसं वाटत नव्हतं काहीच कसं वाटत नव्हतं

9 likes 49 shares
WhatsApp