Back to feed
S
Sahil Agarwal love · marathi · romantic

तू नसतोस तेंव्हा .... आभासांना कवटाळण्यातच सरतो दिवस... तू नसतोस तेंव्हा... घरात अस्ताव्यस्त पडलेल्या तुझ्या वस्तुं मध्येच तुला शोधता शोधता सरतो दिवस.... तू नसतोस तेंव्हा... तू अंगातुन काढलेला शर्ट माझ्या आंगावर चढवून तुझ्या सुगंधाच्या नशेत सरतो दिवस..... तू नसतोस तेंव्हा.... गॕलरीत चहा पितांना तू टाकलेली सिगरेटची धुटकं भित भित गोंजारतच सरतो दिवस..... तू नसतोस तेंव्हा.... असाच माझ्या सावलीत लपलेल्या तुला शोधता शोधताच सरतो दिवस... तू नसतोस तेंव्हा.... स्पंदन......

57 likes 72 shares
WhatsApp