Back to feed
A
Atharv Agarwal life · marathi · life

तू माझी झाली नाहीस म्हणून हे जगमला वेड्यात काढतं, माझं होणं म्हणजे काय माझं निरागस मन त्यांना विचारत रहातं, प्रेमात मिलनच झालं नाहीतर काय अर्थ त्या प्रेमाचा, फुकट गेले सारे क्षणकाय अर्थ त्या भावनांचा, मग मी म्हणतो जगास तुम्हास काय कळतं प्रेमाच, प्रेम हे भावनांनी होत तेथे कामच काय शरीराच, तुम्हीही केलं असेल प्रेम खेळलाही असाल शरीराशी, पण त्या आठवणी कुणीघेवून फिरतो कां हृदयापाशी, जे क्षणभंगूर आहे त्यात मला कधीच रस नव्हता, मला फक्त माझ्या प्रेमाच्याआत्म्याचा स्पर्श हवा होता, धरती न आभाळसागर न किनारायाचं मिलन कधी होणार कां ? म्हणून त्यांच्या प्रेमाला काय अर्थअसं म्हणता येत कां ?तुझं मन , भावना , आत्मा मी माझ्या प्रेमानं जिंकल, तुझ्या मिलनासाठी मी कायम झुरेलं हे सुख काय कमी नाही का ? शरीरा पलीकडेही प्रेम असतं हे या जगास कधी कळेल कां ? जे प्रेम मला गवसलंय ते प्रेम यांच्या नजरेस तरी पडेल कां.? प्रत्येक क्षण बेधुंद होऊन जगणं सावलीसारख तिचं माझ्यासोबत असणं, सुख असो व दुखः तिचा आधार वाटणं मनापासून तिचा माझ्यावर विश्वासअसणं, हे प्रेमच तर आहे नां ...मीच कुठलीही आस ठेवली नाही प्रेमाकडून,असं ही प्रेम असतं हे दाखवलं माझ्या प्रेमातून.......! 💞❤️💞❤️❤️💞❤️💞❤️💞❤️💞❤️💞❤️💞❤️💞❤️💞

116 likes 86 shares
WhatsApp