Back to feed
M
Myra Mehta Love · Marathi · Family

तू मानीनी, तू स्वामीनी तू दुर्गा आणि महाकाली ही तुच अबोल तू, तू शांत ही तू रणरागीणी आणि प्रेमळ ही तुच कणखर तू, तू हळवी ही तू रूक्ष, आणि उदारही तुच आनंदी तू, तू उदास ही हतबल तू आणि प्रेरणादायी ही तुच.. मायेचा पाझर तू,प्रेमाचा आधार तू मनं जाणणारी तू, नाती जपणारी ही तुच.. आईचं लेकरू तू, बाबाची माधुरी तू प्रियकराची प्रेयसी तू, बाळाची आई ही तुच.. तू संत, तू महंत आदि तू आणि अंत ही तुच.. 💝💝💝💝💝💝💝💝💝💞💝💝💝💝💝💝

0 likes 0 shares
WhatsApp