Back to feed
A
Anika Kapoor love · marathi · romantic

तु सोवळी सोन सकाळी मंगल वेळी तु सकाळी तुळस ओवाळी कोमल कांती हि सोवळी केसांची बट गालावर रुळी हे तुझे रुप पाहण्यास सूर्य किरण लडीवाळ पडे गोजीऱ्या चेहऱ्यास तुझ्या हि सोन किरणे स्पर्शुनी छेडे मंद धुंद शिकेकाईचा सुवास हा असा वातावरणात भीडे ओल्या केसात शुभ्र हा पंचा धुंद होऊनी बिलगुनी पडे हातावरील हिरवा चुडा खण खण नाच असा धरे खांद्यावरती लाल पदर हा अंगावर गोल गोल फिरे ओठांची ती हालचाल मधुर अशी साद घाले रुप तुझे रोज सकाळी असे माझ्याशी बोले

247 likes 52 shares
WhatsApp