*तुकास्र - 138* 🙏 *संत तुकारामांचे सुविचार*🙏 *नावडेसा जाला बाप ।* *आलें पाप वस्तीसि ।।* ☸ *म्हणजे,* *"ज्या मुलाला त्याचा बाप आवडेनासा झाला; समजून घ्या, की त्याचा घरी पाप राहायला आलं."* *ज्या वडिलाच्या भरवशावर मुलगा हिमतीनं लहानाचा मोठा झाला. काही अडचण आली, तरी माझे वडील माझ्या सोबत आहेत, अशी भावना ठेवून ज्यानं जग जिंकण्याचा प्रयत्न केला. आता तो मुलगा मोठा झाल्यावर त्याचे म्हातारे वडील त्याला आवडेनासे झाले?* *बापानं आयुष्यभर पोरासाठी पैसा कमावला. पोराच्या सुखासाठी स्वतःच्या पोट भरण्याकडंही दुर्लक्ष केलं. पोट पाठीला लागेपर्यंत कष्ट केले. आपल्या आयुष्यभराची कमाई कसलाही विचार न करता लेकराला आयती हातात देऊन टाकली. घर, गाडी, शेती मुलाच्या नावावर केली. त्याच्या सुखात सुख पाहिलं. त्याच्या विजयात स्वतःचा विजय पहिला आणि आनंद मानला. पास मुलगा झाला आणि गावभर साखर बापानं वाटली.* *पण आज, मुलगा मोठा आणि बाप म्हातारा झाला. आणि तोच हवाहवा असणारा बाप अचानक नकोनकोसा झाला.* *दुर्बुद्धीच्या पापानं बापाला दूर केलं. ज्याअर्थी बापाचा तिरस्कार झाला, त्याअर्थी मुलानं बापाऐवजी पापाला घरात राहायला जागा करून दिली, असं समजा.* *बापाला दूर करणाऱ्या पापाला प्रायश्चित्त एकच; पापाला मनातून काढून बापाला घरात घेणे, आणि सन्मान देणे, एवढंच.* *शेवटी सांगणं हेच- संगत पापाची नको, बापाची करा. अजूनही प्रत्येक मुलाचं खूप भलं होणं बाकी आहे.* *विठ्ठल भेटीसाठी भक्ताच्या दारात उभे असतानासुद्धा भक्त पुंडलिक विठ्ठलाजवळ गेले नाही. कारण देवाच्याही सेवेपेक्षा महत्वाची सेवा ती म्हणजे आईवडिलांची सेवा. पुंडलिक आपली आई सत्या आणि वडील जनुदेव यांची सेवा करीत होते.* *म्हणून विठ्ठलाचे हात कमरेवर असले, तरी डोळे मात्र उघडे आहेत, हे लक्षात ठेवा. त्यांना पुंडलिक ओळखू येतो.*
38 likes
29 shares