Back to feed
R
Reyansh Bagale love · marathi · romantic

तुझे असणे माझ्यातले ================ जिकडून तुझा गंध येतो ती वाऱ्याची दिशा ठरते तुझ्याच खिडकी समोरी चंद्राचेही पाऊल अडते तू गाढ झोपेत असतांना सूर्याचे मन तुझ्यात विरघळते पहाटेला तेजपुंज किरणे तेव्हा धरणीवर पडते तुझाच गंध लेवुनी कळी अंगणातली उमलते तो गंध श्वासास येऊनी तू माझ्यात दरवळते दवबिंदूही तुझा चेहरा त्यांच्यात सामावून घेते म्हणून प्रत्येक दवबिंदूत तूच मला दिसते तुझे असणे माझ्यातले जगणे किती सुंदर करते म्हणून प्रत्येक क्षणी माझे मन तुझ्या प्रेमात जगते ===============💝💝💝💝💝💝

32 likes 15 shares
WhatsApp