Back to feed
K
Krishna Rao friendship · marathi · friendship

..तुझे नी माझे नाते आहे तरी कसे? यात आहे मैत्रीचा गोडवा आणि प्रेमही दिसे. फक्त तुझ्याकडूनच का आहे नकार माझ्याकडून तर नेहमी होकारच असे तुझे नी माझे नाते आहे तरी कसे? .. तुला वाटे ही मैत्री, मला वाटे प्रेम. आपल्या दोघांचेही विचार का गं नाहीत सेम. बोलण्यात तुझ्या नेहमी एक वेगळीच काळजी दिसे, तुझे नी माझे नाते आहे तरी कसे? . तुला फक्त मैत्रीच का दिसे माझ्यात? माझे तर पुर्ण विश्वच आहे तुझ्यात. करुन तुझ्यावर प्रेम मी चूक तर केली नसे, तुझे नी माझे नाते आहे तरी कसे? तुच आहेस माझी प्रेयसी, असेल मी तुझा मित्र, का झाले असावे आपले नाते एवढे विचित्र. नसेल मी मनात तुझ्या, तु नेहमीच माझ्या हृदयात वसे तुझे नी माझे नाते आहे तरी कसे?

249 likes 66 shares
WhatsApp