Back to feed
A
Aditya Pawar Family · Marathi · Family

*तद्दन खोटारडी पब्लिक !* ************************* बॅंकांसमोरील रांगा मोठ्या आहेतच, बऱ्यापैकी त्रासही होऊ शकतो, आणखी चार-सहा दिवस असेच चालेल.... पण एवढा त्रागा करुन काय उपयोग? हेच सुशिक्षित लोक, स्वत:च्या पैशाने "जेवायचे" असूनही, नामवंत हॉटेलसमोर याचकासारखे ताटकळतात, साधी मिसळ ती काय; पण ती मिळवायसाठी आधाशीपणाने वाट बघत उभे राहातात, जसं काही चतुर्थीलाच बाप्पा जागा असतो असे समजून पावणाऱ्या गणपतीपुढे रांगा लावतात, मॉलमध्ये तासनतास रेंगाळतात, अहो, रिसेप्शनमध्ये तर पाणीपुरी, कटलेट आणि आईस्क्रीमच्या ठेल्यासमोर भिकाऱ्यासारखे धडपडतात ! यातलं काय जीवनावश्यक आहे? तरी तडफडतात ना? असल्या लोकांना देश वगैरे काय कळणार !

51 likes 74 shares
WhatsApp