S
Sara Joshi
life · marathi · life
त्या चंद्रात आणि माझ्यात एक नातं आहे. साम्य नाही कुठलही तो आकाशातला स्वप्रकाशी तारा सर्वांना हवाहवासा वाटणारा अगदी तान्हुल्यालाही गोष्टीतून भेटणारा मी ही बोलते रोज त्याच्याशी माझ्या मनातल सगळच अगदी मनाच्या तळात दडलेल सुद्धा त्यालाही समजते माझ्या मनाची भाषा म्हणुनच नेहमी त्याच्या चेह-यावर वेगवेगळी भावस्पर्शी आकार दिसतात मला मी बोलते मग त्या आकारांशी ही मी ओळखते चंद्राच्या कला मधले चढते उतरते भावबंध जसे तो ही ओळखतो माझ्या मनातील भावनांचे हिंदाेल
60 likes
43 shares