P
Prisha Malhotra
family · marathi · family
तुला मी शोधलं मातीच्या ढिगार्यात नुसताच चिखल लागला तरीही नाही भेटलास तुला मी शोधलं कुंभाराच्या गाडग्यात गोर्याची माती तुडविली रिकामा तळ लागला .... तरीही नाही भेटलास तुला मी शोधलं अक्षांश आणि रेखांशांच्या जाळ्यात राहू केतू आणि मंगळाच्या कुंडलीत नुसतेच ढिगारे ग्रहांचे ..... तरीही नाही भेटलास तुला मी शोधलं उभा आडवा खोल अथांग सागरात किनार्याच्या मृगजळात नुसतीच वाळू सरकली पायाखालची ... तरीही नाही भेटलास मला आठवलं मग, म्हणून गाभार्यात शोधलं नारळ, कोंबड्या बकर्या दिले आणि नमस्कार केला नुसतेच कपाळ फुटले तरीही नाही भेटलास तुला मी शोधणार आहे माझ्यातल्या माझ्यात खोल खोल मनाच्या तळ्यात उपसून काढावा लागेल षड् रिपूंचा गाळ, असणारच तू तिथे नक्की भेटशी
201 likes
21 shares