N
Navya Mishra
humor · marathi · humor
थंडी वाढत चाललीय... त्यामुळे आंघोळीचे खालील प्रकार वापरता येतील. 1 - काकड स्नान - या स्नानात पाण्याच्या थेंबांना आपल्यावर शिंपडून स्नान केले जाऊ शकते. 2 - नळ नमस्कार स्नान - यात तुम्ही नळाला नमस्कार करण्याने आंघोळ झाली असे समजण्यात येईल. 3 - जल स्मरण स्नान - हे उच्च कोटीचे स्नान असून अंथरूणात राहूनच पाण्याने आंघोळ करतोय या स्मरणानेच आंघोळ झाली असे होईल. 4 - स्पर्शानुभूती स्नान - या प्रकारात आंघोळ केलेल्या व्यक्तीला स्पर्श करून "त्वं स्नानम् मम् स्नानम्" बोलल्याने आंघोळ झाली असे मानण्यात येईल॥ 😜😂😂😂😂
234 likes
27 shares