Back to feed
M
Myra Kapoor Family · Marathi · Family

दोन आजोबा आपसात गप्पा मारत बसले होते. पहिले आजोबा दुसऱ्याना म्हणाले, "अहो माझी नात लग्नाची आहे B.E. झालेली आहे, पुण्यात जाँब करते, उंच आहे, सुंदर आहे, एखादा चांगला मुलगा सुचवा," दुसरे आजोबा :-"अपेक्षा काय आहेत ?" पहिले आजोबाः- "फारशी नाही, परंतु मुलगा M.E.किंवा M.Tech. असावा, पुण्यातला असावा, पुण्यात स्वतःचा फ्लॅट असावा व लाखाच्या वर पगार असावा, घरी थोडी शेती असावी." दुसरे आजोबाः-"आणखी काही ?" पहिले आजोबाः- "महत्वाचे म्हणजे मुलगा एकटा असावा, त्याला भाऊ, बहीण, आई वडील, आजी आजोबा कोणीही नसावेत (डस्ट बीन नकोच )"😀 दुसरे आजोबा :-"तुम्हाला पाहिजे तसा मुलगा माझ्या कडे आहे, एकटाच आहे, त्याला भाऊ बहीण कोणीच नाही, माझ्या मित्राचाच नातु आहे. मुलाचे आई-वडिल दोन वर्षापूर्वी अँक्सीडेंट मध्ये वारलेत, आजी- आजोबा देखील वारलेत, मी प्रयत्न करतो. पण त्या मुलाचीही एक अट आहे. ,मुलीला भाऊ-बहीण, आई-वडिल आजी-आजोबा ( डस्ट बीन ) कोणीही नकोत. तुमचा पूर्ण परिवार जर आजच आत्महत्या करत असेल तर तुमच्या नातीसाठी हा मुलगा पक्का समजा."

227 likes 45 shares
WhatsApp