दारु पितो कधी तरी हफत्यातून एकदा.. आम्हाला बेवड़ा म्हणू नका.. घर दार सांभाळून करतो सार.. उगाच आमच्या नावाने ओरडु नका.. दिवसभर राब राब राबतो बैलासारख.. थोडा विरंगूळा आम्हाला हवा असतो.. तुम्ही दिवसभर बसता सिरियल बघत.. आम्ही मात्र दिवसातले 12-14 तास ऑफिसात घासतो.. बर्फ ग्लासात पडला की जिव भांड्यात पडल्यासारख वाटत.. बायको पेक्षा दारु जास्त प्रेम करते हे मनोमन मग पटत.. चार मित्र भेटतात ज़रा देशाच्या विकासाची आखणी होते.. सुरक्षा मंत्री योग्य आहे की नाही याची व्यवस्थित चाचणी होते.. चाखणा संपतो अलगद ग्लास ओठांशि करतो चर्चा.. टेंशनने भरलेला खाली होतो मग मजला डोक्यातला वरचा.. बाकी काही नाही थोडासा मनावरचा ताण होतो कमी.. एखाद दिवस लेट होतो पण एरवी ऑफ़ीसातून थेट घरी येतो की नाही आम्ही.. दारु पितो कधी तरी हफत्यातून एकदा.. आम्हाला बेवड़ा म्हणू नका.. घर दार सांभाळून करतो सार.. उगाच आमच्या नावाने ओरडु नका..!!! 😂😂😂😁😁 आता गालातल्या गालात हसु नका☺☺ Dedicated to All Drinker friends. 🍺🍺🍺🍺🍺🍺🍺
P
Prisha Bose
friendship · mixed · friendship
113 likes
78 shares