K
Kiara Deshmukh
spiritual · marathi · spiritual
दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणांते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी त्रिभुवन भुवनी पाहता तुज ऐसे नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद करिता पडिले प्रवाही ते तू भक्ता लागे पावसी लवलाही जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदासा क्लेशांपासून सोडवी तोडी भवपाशा आंबे तुजवाचून कोण पुरवील आशा नरहर तल्लीन झाला पदपंकज लेशा जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी
220 likes
45 shares