।। दास-वाणी ।। वडिलां वडिलपण नाही । धाकुटयां धाकुटपण नाहीं । ऐसें बोलती त्यांस नाहीं । शाहाणपण ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १५/०३/१६ जो खरोखरच ज्ञानाने, गुणाने मोठा आहे त्याचे मोठेपण मान्य करत नाही. उलट जो अडाणी आहे, श्रेष्ठतेमधे कमी आहे त्यालाच मोठेपण द्यायचे. का तर तो फक्त वयाने वाढलाय म्हणून. जो ज्ञानवृद्ध तोच खरा वृद्ध , ख-या अर्थाने वर्धिष्णू किंवा वाढलेला आणि तोच वडिल. हे सुद्धा ज्याला समजत नाही त्याला कोणीच शाहाणा समजत नाही. श्रेष्ठअंतरात्मानिरूपण समास.
35 likes
57 shares