।। दास-वाणी ।। येवं पोट भराव्याची विद्या । तयेसी म्हणों नये सद्विद्या । सर्वव्यापक वस्तु सद्या । पाविजे ते ज्ञान ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०६/०१/२३ देहाच्या पालनपोषणासाठी आवश्यक त्या सर्व विद्या या पोटभरू विद्या होत. त्या देहधारणेसाठी उपयुक्त आणि आवश्यकही आहेत. परंतु त्यांचा समावेश सद् विद्येमधे करता येणार नाही. सर्वव्यापक असे परब्रह्म ज्या विद्येमुळे प्राप्त होते. जीव शिवाचे ऐक्य ज्याद्वारे प्रत्यक्ष घडते ती ब्रह्मविद्या ही एकमेव सद् विद्या होय. आत्म्याचा परमात्म्याशी विलय हेच ज्ञान होय.
27 likes
4 shares