Back to feed
S
Shaurya Singh Family · Marathi · Family

"दहावीची परीक्षा संपली मुलीला सांगितलं कि आधी दोन पोळ्या भाजी व्यवस्थित बनवण्यास शिक मग पाहिजे ते क्लास लावेन " एका मैत्रणीच तिच्या मुली सोबतच संभाषण ऐकल आणि समाधान वाटल की आजच्या बदलत जाणार्या काळात काही आई अश्या पण आहेत कि मुलीला निदान बेसिक गोष्टी तरी यायला पाहिजेत ह्या ठाम मताच्या आहेत. कदाचित हे वाचून तुम्हाला मी अगदीच मागच्या पिढीतली वाटेल , पण समाजात सध्या जे बघतीय , अनुभवतिय त्यावरून वाटतय की आईचेच संस्कार कुठेतरी कमी पडत आहेत का ? मुलीला , अगदी मुलासारख वाढवण्याच्या नादात आपण कुठेतरी गफलत करतोय अस नाही का वाटत . मुली अगदी प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत करताना दिसत आहेत, उच्चशिक्षित , चांगली पगाराची नोकरी अगदी मुलांना पण मागे टाकतील अश्या क्षेत्रात प्राविण्य मिळवणे , पण जेव्हा कुटुंबव्यवस्थेची गोष्ट येते तेव्हा तिथे फरफट होताना दिसते . अभ्यास , विविध क्लास ,उच्च शिक्षण ह्या सगळ्या गोष्टी अभिमानाने शिकवता शिकवता कित्येक आई बाबा आपल्या मुलीला अगदी छोट्या छोट्या गोष्टी शिकवत नाहीयेत किंवा त्या गोष्टी ह्या सगळ्या समोर इतक्या महत्वाच्या वाटत नाहीयेत . बेसिक जेवण बनवता येण , घर कस चालवायच , कामच नियोजन , भाजी किती आणि किती दिवसा साठी आणायचं , महीन्याच नियोजन असो किंवा चार पाहुणे घरात एकदम आले तर काय करायचं. रोजच्या गोष्टींच मियोजन मोठ्या व्यक्तीचा आदर कसा करायचा, स्त्री पुरूष समानता नको तिथे नको तितकी बाळगायची. ह्या गोष्टी कुठेतरी मागे पडत आहेत . परवा एका लग्न होऊन दोन एक वर्ष झालेल्या मित्राचा फोन आला . कस चाललय अस विचारलं असता त्यान सांगितलेले ऐकून विचारातच पडले , दोघेही नोकरी करतो , सकाळी उठून मी चहा बनवतो , तिला देतो, तो घेवून आपापल्या ऑफीस मध्ये तिथेच नाश्ता, दुपारच जेवण , संध्याकाळी आठ दिवसातले चार दिवस बाहेर, तिन दिवस खिचडी किंवा पिझ्झा ओर्डेर केल्या जातो ह्या शिवाय काहीही बनत नाही. कंटाळा आला तेच तेच बाहेरच खावून, अकरावीपासून घराबाहेर होतो ते आज पर्यंत आठ, नऊ वर्ष झाले ... घरच्या जेवणासाठी तरसत होतो , त्यावरून खटके , वादावादी , भांडणे आणि परीणाम मनस्ताप ...शेवटी ठरवलं कि आपण आपला निर्णय घ्यायचा , सकाळी उठतो कुकर लावतो , भाजी करतो , पोळीचे पार्सल येते दोघांचाही डबा भरतो आणि तिलाही देतो आणि मीही घेवून जातो . संध्याकाळच पण तेच थोड्या बहुत फरकाने. अजून एका जवळच्या भावाची गोष्ट म्हणजे ,बायको नोकरी करत नाही पण साध भाजी पोळी पण बनवता येईना , सकाळी ह्याला ९ ला निघायचं तर ती उठणार ८.३० ला ,तोच हिला ऊठवुन जातो . संध्याकाळी आल्यवर तिच गत. भाजी ,सामान किती आणायचं तेही कळत नाही . प्रत्येक गोष्टीत तिच्या आईची लुडबुड तंग झालो ह्या सगळया गोष्टीनी. लग्न झाल्या नंतर मुलीना आईच इतक ऐकायचं असत तर आई मुलीला लग्ना आधी ह्या छोट्या छोट्या गोष्टी का ग शिकवत नाही ? त्याचा हा प्रश्न मात्र निरुत्तर करून गेला. खर तर हा खूप मोठा आणि व्यापक, वेगळा विषय आहे परत कधीतरी लिहेन ह्यावरती . जास्तीत जास्त एक किंवा दोन मुल , त्यातही एक मुलगा आणि एक मुलगी मग आपण कसे पुधारलेलो आहोत किंवा आम्ही मुलगा आणि मुलगी हा भेदभाव करत नाही किंवा अति लाड किंवा शिक्षण आणि क्लासेसचा मारा ह्या सगळ्यात आपण आपल्या मुलीला मुल्य शिक्षणा पासून तर वंचित करत नाही आहोत न हे प्रत्येक पालकाने चिंतन करावयास हवे . संसार दोघांचा असतो त्यामुळ दोघांनी आपआपली जबाबदारी ओळखुनच तो करावयास हवा. अशी एक ना अनेक उदारहण अवती भोवती पाहते तेव्हा वाटत आपल्या आई बाबांनी शिक्षण देता देता किती गोष्टी नकळत शिकवल्या ज्या जीवनात पावलागणिक उपयोगी पडत आहेत . त्यांनी फक्त मुलीलाच नाही तर मुलाला सुद्धा ह्या सगळ्या बेसिक गोष्टी शिकवल्या . माझ्या दोन्ही भावाला पण पूर्ण जेवण बनवता येते इतकच नाही तर स्वतःचे छोटी मोठी सगळी काम स्वतः कशी करायची हे सुद्धा जमत . भलेही आईच घर खूप कर्मकांड करणार असल तरीही , स्त्री -पुरुष समानता त्यावेळेस सुद्ध्या त्यांनी जपली . आईला सकाळचा पहिला चहा , बाबांच्या हाताचा असे तर पुढे दिवसभर आई खिंड लढवत असे . एका मैत्रीणीला दोन्हीही मुल पण दोघेही जेवण बनवण्यात आणि घरच्या सगळ्या कामात अव्वल .एका मैत्रिनीने मुलाला पण सगळ्या गोष्टी शिकवल्या होत्या, स्वयपाकापासुन ते कामाच्या नियोजनापर्यंत जेव्हा तो उच्चशिक्षणासाठी लंडनला गेला तेव्हा त्याला दुसर्या मुलांच्या तुलनेत खूप कमी त्रास झाला . तेव्हा मित्र -मैत्रीणीनो आपल्या बछड्यांना जसे शिक्षण आवश्यक वाटते तसे जगण्याचे हे मुल्य शिक्षण सुद्धा ....

221 likes 78 shares
WhatsApp