धावता धावता धप्प पडला तोंडातून आवाजही नाही आला हाक मारून थांब म्हणायचे होते पण तो काहीच नाही बोलला प्रेम हे कधी मागायचे नसते कितीही ह्दयात खुपले जरीही सारे हसत सहन करायचे असते अगदी सारे काही संपले तरीही गप्प तसाच तिथेच पडून राहीला तो पाठून काही त्याला कुचलून ही गेले पण काही सुद्धा बोलला नाही तो तिनेच तर त्याला तिथे होते ना सोडले धडपडत उठून चालू लागला तो ती कधीच खूप दूर गेली होती स्वत: च स्वतःबरोबर जगू लागला तो तीच्या असण्याची त्याला आशा नव्हती काही प्रवास असेच धडपडत संपतात पाठी फक्त भग्न जखमा उरतात काही नाही त्यांवरही कविता करायच्या कधी काही स्वप्नांना गुडबाय म्हणायचा कधी काही स्वप्नांना गुडबाय म्हणायचा ❤️💓❤️💓❤️💓❤️💓❤️💓❤️❤️💓❤️💓❤️💓💓
209 likes
32 shares