Back to feed
S
Sai Bhat Friendship · Mixed · Friendship

**नक्की वाचा... खरतर काही लोकांचा जीव त्यांची प्रियसी न बायको असते पण माझा जीव माझी आई आहे मी देवाला एकच वंदन करतो की माझी खुशी माझ्या आई ला मिळू दे आयुष्यात सगळं काही परत मिळत पण आई नाही माझं माझ्या आई वर आजही ती नसताना पण खूप खूप खूप प्रेम आहे...काही मित्र म्हणतील किती बावळट आहे हा नेहमी "आई-आई" करत राहतो. कोणी काही जरी बोलत असेल तरी तिच्या वरची माझी श्रद्धा कमी होणार नाही. जीन जीवनाच्या प्रवासाला सुरुवात करून दिली , आणी या समाजामध्ये रहाव कस वागाव कस आणी घडावं कस हे शिकवलं त्या मातेचे पांग या जन्मात फेडणे शक्य नाही ,मायेचा गोडवा तिच्या प्रत्येक शब्दात मला भासतो ,तरी मग आम्ही वृद्ध आई चा तोल सांभाळन्यासाठी का मग लाजतो ,शेवटी एकच म्हणेल ,आई आहे अशी एक शिदोरी जी सरत हि नी आणी उरतही नाही..तिची जागा नाही कोणी घेऊ शकत..तिचा अपमान नका करू..नंतर पच्छाताप करूनही ती दिसणार नाही... **जेव्हा फुटत होती प्लेट बालपणी तुमच्या कडुन आता आई कडुन फुटली तर तिला काहीही बोलु नका.. जेव्हा मागत होते फुगा लहानपणी आई जवळ आता आई चष्मा मागते तर तिला नाही म्हणु नका.. जेव्हा मागत होते चॉकलेट लहानपणी आई जवळ आता आई औषध मागते तिला आणायला विसरु नका.. आई रागवत होती तुम्हाला जेव्हा मस्ती करीत होत तुम्ही आता तिला ऐकु येत नाही तर तिला रागावु नका.. जेव्हा चालत नव्हते तुम्ही आई बोट धरुन चालवत होती आता ती चालु शकत नाही तर तिचा हात पकडुन सहारा द्या.. जेव्हा रडत होते तुम्ही आई छातीला लावत होती आता सहन करा दु:ख तुम्ही तिला रडु देवु नका.. जेव्हा जन्मले होते तुम्ही आई तुमच्या जवळ होती जेव्हा आईचा शेवटचा क्षण येईल तेव्हा तिच्या जवळ नक्की थांबा.. * आयुष्यात खुप अडचणी येतील पण त्याच्यासाठी जगा... जे तुमच्यासाठी स्वत:चा जिव अर्पण करतात... विचार करा..* I love you aai.....

221 likes 18 shares
WhatsApp