Back to feed
S
Sara Rao family · marathi · family

नजरेने कशी जादू घडली गाली लाली अशी चढली नजर कशी खाली झुकली प्रीत तुझी ग , मी ओळखली स्पर्श तुझा किंचित घडला रोमांच कसा शरीरी भरला स्पर्शाची जादू , अशी घडली प्रीत तुझी ग , मी ओळखली नजरेस नजर अशी मिळाली लज्जेने गोरीमोरी कशी झाली तुझी मुग्धता , सांगुन गेली प्रीत तुझी ग , मी ओळखली

260 likes 64 shares
WhatsApp