♻🌀 *नाती* 🌀♻ 🌅 || *आई- वडील* ||🌅 *सार्वकालीन सर्वश्रेष्ठ मानवी नातं पंचमहाभूतापलिकडची सहावी महाभूतं, आपल्या घराची जीवित दैवत, तीर्थाचे सागर , स्नेहाचे आगर आपल्या सौख्यासाठी स्वजीवन विसरणाऱ्या त्यागमूर्ती, आपण जन्माला येण्याआधीच आपल्यावर प्रेमसिंचन करणारे स्नेह - निर्झर. 🌅 || *गुरुजन* ||🌅 आपल्या भविष्याचे शिल्पकार आपल्या जीवनाचा प्रकाश अज्ञान दूर करणारे वासरमणी मानवतेचे महादूत. 🌅 || *आजी - आजोबा* ||🌅 आपले जीवन फुलविणारे माळी आपल्या लाडाचं स्थायी व्यासपीठ सदैव आपली बाजू घेणारे व आपल्याच बाजुने न्याय देणारे प्रेमळ न्यायाधीश, स्वतःचे रुप आपल्यात पाहणाऱ्या वात्सल्यमूर्ती. 🌅 || *सासू - सासरे* ||🌅 आपल्याला जन्म न देणारे आईवडील पदोपदी जन्मदांची अनुभूती देणाऱ्या स्नेहमूर्ती आपल्या आईवडिलांचे प्रतिरुप. 🌅|| *काका - मावशी* 🌅 आई वडिलांची उणीव भरुन काढणाऱ्या सागर - सरिता विशुध्द भावाचे चिंतामणी. 🌅|| *आत्या - मामा* ||🌅 वडिलकीच्या नात्याची ओळख करुन देणाऱ्या सौजन्यमूर्ती. 🌅|| *मामा* 🌅 मानवी जीवनाचं एक मनोरम नातं जेव्हा दोन मा ( आई ) एकत्र येतात तेव्हा एक मामा तयार होतो मा मा = मामा, आपल्या विवाहाचा विधीवत साक्षीदार. 🌅|| *मामी* 🌅 आपल्या मान सन्मानाची आरंभकर्ती शैशव अवस्थेत आपली शुश्रुषा करणारी सेवाव्रती. 🌹|| *दाजी* 🌹 आपल्या आदर भावाचं शिखर आपले आदर्श , आपले जीवन दर्शक. 🌅 || *बहिण* ||🌅 आईची पडछाया , उत्सवप्रिया सणसूचिका मायेचा सुगंध पालवणारी स्नेह लतिका, कुठल्याही परिस्थितीत आपल्या हिताचा विचार करणारी हितचिंतिका. 🌅|| *भाऊ* ||🌅 आपल्या हिमतीच्या धमन्या, आपली शक्ती सुरक्षा यांची नैसर्गिक आवरणं, आपल्या सामर्थ्याची कवच कुंडलं, आपल्या आवाजातील निनाद. 🌅|| *साडु* 🌅 एकाच आईचं दूध प्यायलो नसलो तरी शाश्वत बंधुता निर्माण करणारं अनोखं नातं. इस्टेटीत वाटा न मागणारा भाऊ. 🌅 || *मेहुणी* ||🌅 आपले जीवन खेळकर करणारी स्नेह सरिता, आपले सासरचे वास्तव्य रमणीय करणारी हर्षवर्धिनी. 🌅|| *मावस भाऊ - बहीण* 🌅 बहीण भावाच्या नात्यातील प्रीतिचा बोनस, बहीण भावाची उणीव भरुन काढणारे समर्थ पर्याय. 🌅|| *मेव्हणा भाऊ - बहीण* ||🌅 नात्यात खेळकरपणा पेरणाऱ्या तिफणी, थट्टा मस्करीतून प्रीतीचा आविष्कार करणारे जीवलग. 🌅|| *भाचे - भाची* ||🌅 संस्कृतीचे भान देणारे प्रीतीचे ताटवे, आपल्या दातृत्वाची शोभा वाढविणारी कोंदणं. 🌅|| *पुत्र* ||🌅 भविष्याचा प्रकाश, अस्तित्वाचा अर्थ, वंशाचा कुलदीपक,कुटुंबाचा उध्दारक म्हातारपणीची काठी. 🌅 || *मुलगी* ||🌅 पहाटेचं दव , वात्सल्याचं विरजण, मायेत खोट नसणारी स्नेहनंदिनी, पवित्र प्रीतीची सह्रदयी झुळूक, मायेला वाळवी लागत नाही अशी वात्सल्यरुपा, जिची माया शिळी होत नाही अशी अक्षय प्रेमज्योती. 🌅 || *नातवंडे* ||🌅 दुधावरली साय, आयुष्याच्या उतारावरील रमणीय बगिचा, अखेरपर्यंत जीवनाची गोडी टिकवून ठेवणारे मधुघट. 🌅 || *मित्र मैत्री* ||🌅 ईश्वरी वरदान, रक्ताच्या नात्यालाही लाजवणारं चिरंतन नातं, विश्वासाची आधारशीला, स्वतःचेच प्रतिरुप. 🌅 || *शेजार धर्म* ||🌅 मानवी मूल्यांचा ओझोन, संस्कृतीचा संधीप्रकाश, आपल्या सौख्याचा आलेख टिपणारी स्पंदन. 🌅|| *शिष्य* ||🌅 आपल्या कर्तृत्वाचा कळस व आपल्या कौशल्याची किरणं. *खरंच* .... *माणुस* नाते जपतो का ? जो जपतो नात तोच खरा माणुस . नातं जोपासणारा माणूस जणू पिसारा फुलवलेला मोरच ! नाही का ? 🙏🙏🙏नाते जपा.......नाते टिकवा........! माणुस म्हणुन जगा...... " हे जीवन पुन्हा नाही "..........! 🙏🙏
110 likes
61 shares