Back to feed
J
Jiya Mehta Good_Morning · Marathi · Life

नात्यांचा नजराणा काही नाती म्हणजे जणू *धुंद मोगरा* पानोपानी फुलुन येई येता चैत्र साजरा! काही नाती म्हणजे जणू *टपोरा गुलाबच* भाव खाऊन जातात प्रत्येक वेळेसच! काही नाती म्हणजे *सोनचाफा अन् नागचाफा* नाजुकपणे अलगद त्यांना गुंफा! काही नाती म्हणजे भरभरून फुलणारी *बकुळ* पुन्हा नव्याने मनाला घालती भुरळ! काही नाती म्हणजे *जाई जुई चमेली* इवलेसे क्षण जपताना होती नवनवेली! काही नाती म्हणजे *सदाफुली अन् अबोली* समजेना मनस्वी त्यांची देहबोली! काही नाती म्हणजे *जर्द पिवळी शेवंती* समर्पणाचे भाव तेथे असती! काही नाती म्हणजे * जास्वंदी* अस्तित्वात त्यांच्या होती चित्तवृत्ती आनंदी! काही नाती म्हणजे फुललेले *निशिगंध* मनात सदैव असे त्यांचा सुगंध! काही नाती म्हणजे *मोहरलेली रातराणी* प्रसन्न करती त्यांच्या मुग्ध आठवणी! काही नाती म्हणजे *कोरांटी काटेरी* सल सदैव रूते त्यांच्या अंतरी! काही नाती म्हणजे *रानफुले* ज्यांना नसे सुवास परंतु हृदयी त्यांचा राहे अखंड वास! काही नाती म्हणजे *चिखलातील कमळ* बिकट परिस्थितीत देई जगण्याला बळ! काही नाती *पारिजातकाचे* लेणं, त्याच्या संगे जगताना लाभे अभंग लेणं! *असे नात्याचे सुगंधी सुमन वेचायचे,* *सुगंधी नात्याचे रेशीम धागे गुंफायचे!* 🌹🌹🌹शुभ सकाळ🌹🌹🌹

241 likes 39 shares
WhatsApp