नात्यांची विलोभनीय उत्कटता: || *आई- वडील* || सार्वकालीन सर्वश्रेष्ठ मानवी नातं पंचमहाभूतापलिकडची सहावी महाभूतं आपल्या घराची जीवित दैवतं तीर्थाचे सागर , स्नेहाचे आगर आपल्या सौख्यासाठी स्वजीवन विसरणाऱ्या त्यागमूर्ती आपण जन्माला येण्याआधीच आपल्यावर प्रेमसिंचन करणारे स्नेह - निर्झर || *गुरुजन* || आपल्या भविष्याचे शिल्पकार आपल्या जीवनाचा प्रकाश अज्ञान दूर करणारे वासरमणी मानवतेचे महादूत || *आजी - आजोबा* || आपले जीवन फुलविणारे माळी आपल्या लाडाचं स्थायी व्यासपीठ सदैव आपली बाजू घेणारे व आपल्याच बाजुने न्याय देणारे प्रेमळ न्यायाधीश स्वतःचे रुप आपल्यात पाहणाऱ्या वात्सल्यमूर्ती || *सासू - सासरे* || आपल्याला जन्म न देणारे आईवडील पदोपदी जन्मदांची अनुभूती देणाऱ्या स्नेहमूर्ती आपल्या आईवडिलांचे प्रतिरुप || *काका - मावशी* || आईवडिलांची उणीव भरुन काढणाऱ्या सागर - सरिता विशुध्द भावाचे चिंतामणी || *आत्या - मामा* || वडिलकीच्या नात्याची ओळख करुन देणाऱ्या सौजन्यमूर्ती || *मामा* || मानवी जीवनाचं एक मनोरम नातं जेव्हा दोन मा ( आई ) एकत्र येतात तेव्हा एक मामा तयार होतो मा मा = मामा आपल्या विवाहाचा विधीवत साक्षीदार || *मामी* || आपल्या मान सन्मानाची आरंभकर्ती शैशव अवस्थेत आपली शुश्रुषा करणारी सेवाव्रती || *दाजी* || आपल्या आदर भावाचं शिखर आपले आदर्श , आपले जीवन दर्शक || *बहिण* || आईची पडछाया , उत्सवप्रिया सणसूचिका मायेचा सुगंध पालवणारी स्नेह लतिका कुठल्याही परिस्थितीत आपल्या हिताचा विचार करणारी हितचिंतिका || *भाऊ* || आपल्या हिमतीच्या धमन्या आपली शक्ती सुरक्षा यांची नैसर्गिक आवरणं आपल्या सामर्थ्याची कवच कुंडलं आपल्या आवाजातील निनाद || *साडू* || एकाच आईचं दूध प्यायलो नसलो तरी शाश्वत बंधुता निर्माण करणारं अनोखं नातं इस्टेटीत वाटा न मागणारा भाऊ || *साली / मेहुणी* || आपले जीवन खेळकर करणारी स्नेह सरिता आपले सासरचे वास्तव्य रमणीय करणारी हर्षवर्धिनी || *मावस भाऊ बहीण* || बहीण भावाच्या नात्यातील प्रीतिचा बोनस बहीण भावाची उणीव भरुन काढणारे समर्थ पर्याय || *मेव्हण भाऊ बहीण* || नात्यात खेळकरपणा पेरणाऱ्या तिफणी थट्टा मस्करीतून प्रीतीचा आविष्कार करणारे जीवलग || *भाचे भाची* || संस्कृतीचे भान देणारे प्रीतीचे ताटवे आपल्या दातृत्वाची शोभा वाढविणारी कोंदणं || *पुत्र* || भविष्याचा प्रकाश अस्तित्वाचा अर्थ वंशाचा कुलदीपक कुटुंबाचा उध्दारक म्हातारपणीची काठी || *पुत्री* || पहाटेचं दव , वात्सल्याचं विरजण मायेत खोट नसणारी स्नेहनंदिनी पवित्र प्रीतीची सह्रदयी झुळूक मायेला वाळवी लागत नाही अशी वात्सल्यरुपा जिची माया शिळी होत नाही अशी अक्षय प्रेमज्योती || *नातवंडे* || दुधावरली साय आयुष्याच्या उतारावरील रमणीय बगिचा अखेरपर्यंत जीवनाची गोडी टिकवून ठेवणारे मधुघट || *मित्र मैत्री* || ईश्वरी वरदान रक्ताच्या नात्यालाही लाजवणारं चिरंतन नातं विश्वासाची आधारशीला स्वतःचेच प्रतिरुप || *शेजार धर्म* || मानवी मूल्यांचा ओझोन संस्कृतीचा संधीप्रकाश आपल्या सौख्याचा आलेख टिपणारी स्पंदन || *शिष्य* || आपल्या कर्तृत्वाचा कळस आपल्या कौशल्याची किरणं खरंच , नातं न जोपासणारा माणूस जणू पिसारा गमावलेला मोरच ! नाही का ?
75 likes
47 shares