Back to feed
S
Sai Bose spiritual · marathi · spiritual

नवीन नवीन लग्न👫 झाल होत. बायको👰माहेरी🏡 गेली होती एक दिवस वेळ काढून गाडी जुपली आणि सासरवाडीला🏡 निघालो.🚶 लगेचच निघुन दिवस बुडायच्या आधी सासरवाडीत🏡 पोचलो. "पाव्हना आला पाव्हणा आला"" एकच गलका झाला चहा☕पाणी🍸झालं विचारपुस झाली अंधार पडायला सुरुवात झाली. सासूबाईनी ऐन टायमाला मला जे जे आवडत ते बनवलं 🍛🍲🍵🍚🍘🍯 मस्त जेवायला बसलो😋😋😋 बाजरिची भाकरी🍪, झुनका🍛 वांग्याच भरीत, लोणचं🍯 माझा फेवरेट ऊडदाचा पापड🍘, पितळाचा तांम्ब्या भरुन थंडगार पाणी आहाहाहा😋😋😋 मस्त बेत होता!!! सगळे जेवायला बसले पण मला जरा टेन्शन आलेलं 😟😟😟 कारण सगळ्या लोकांच्या ताटात पापड🍘वाढला होता आणि नेमका माझ्याच ताटात पापड🍘नव्हता😥 उडदाचा पापड🍘म्हणजे आपला आवडता आईटम😋 मनात बेचैनी वाढत होती😒 चुलीजवळ सासूबाई बसली होती. तिच्याशेजारी पापडाची🍘परात होती मी जिथे बसलो होतो🙇 तिथून पापड माझ्याकडे आणि मी पापडाकडे बघत 👀 होतो😆😆😆😆 नवीन नवीन लग्न झालेल👫 🏡सासरवाडीत पहिलाच टाईम बरं.... तोंडावर तरी कस मागावं🤔🤔🙄🙄 बायकोला ईशारा करायला ती पण भिंतीच्या 🚪आडाला बसलेली🙎 इचारात पडलो😥😥😥 माझा पण लाजाळू😌😌😌स्वभाव.. ""करा पाव्हनं सुरुवात, काय विचार करत आहात "" सासरा👴बोलला मी म्हटलं ""हा हा करा करा... संध्याकाळी 🌆 मी आलो त्या वेळी.....??⌚ ""सगळ्यानी कान टवकारले😳😳😳"" "काय झालं काय झालं, काही त्रास होतोय का ??""😳😰 मी :""नाही नाही त्रास नाही. मी गाडी सोडली, 🐂बैल🌳झाडखाली बांधत होतो तेंव्हा भलं मोठ्ठ असली जनावर🐍होतं.. ""सासरा, मेव्हणा := ""कुठ??😱😱😱"" लेडीज मंडळीनी एका सुरात-: ""अग बाई गं..""🙆 मी :""चांगला विषारी🐍नागच होता" ""लेडीस : ""बापरे😰😲मंग""..?? मी : ""काही नाही मी त्याला चाबकाने दणका दिला.. तिकडे पांदीकडे🌿🌾निघुन गेला. ""सासूबाई : ""बरं झालं रे🙏देवा,केवढा मोठा होता तो साप🐍??"" मी : ""जास्त नाही. मामी पासून ते त्या पापडाच्या🍘पराती इतका लांब होता😂😂😂 ""सासू चमकून"":= ""अरे देवा... जवायाला पापड🍘दिलाच नाही की..🙆, काय ग...तुला बी ध्यान नाही का" "घ्या घ्या... पापड🍘घ्या ""☺☺☺ ""घेतला की मग.....!!!" 😂😂😂

244 likes 22 shares
WhatsApp